Uncategorizedविशेष

शिरुर नगरपरिषदेच्या वतीने शहरात प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
शिरुर नगरपरिषदेच्या वतीने शहरात प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई
करण्यात आली आहे .३५ किलो प्लॅस्टिक जप्त करत २५ हजार रु . दंड वसूल करण्यात आला आहे .
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील व पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली द नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई दरम्यान दुकानांची तपासणी करून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक आढळून आलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली व २५,०००/- रु. इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच ३५ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
या कारवाईत शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय बर्गे तसेच स्वच्छता मुकादम मनोज अहिरे, सागर कांबळे, किरण जाधव, सफाई कर्मचारी मयूर जाधव, गणेश शेंडगे, रमेश चव्हाण, वामन जाधव, राणी गव्हाणे, श्रीम. इंदुबाई मोरे, शशितल घारु, शांताबाई गायकवाड यांचा सहभाग होता. तसेच पोलिस अंमलदार चैताली सपकाळ नवनाथ दांगडे यांचे सहकार्य लाभले. यापुढेही वेळोवेळी अश्या पध्द्तीने कारवाई करण्यात येणार असल्याचे बर्गे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button