राष्ट्रीय
Check Also
Close
-
शिरूर पोलीस ठाण्याचे आता नव्या वास्तूतून कामकाज3 weeks ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}भारत सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जनगणना २०२७ प्रक्रियेत यंदा प्रथमच डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरबसल्या स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा जनगणना सन २०२७ चे २०२७ चे चार्ज अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.

यासाठी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून स्वतःची माहिती भरता येणार आहे.
१६ मेनंतर जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकास तो सादर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर संबंधित प्रगणक पोर्टलवर आयडी अपलोड करून माहितीची अधिकृत नोंद करतील.

