Uncategorized
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शिरूर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शिरूर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. शासकीय कार्यालये, नगरपरिषद तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
तहसीलदार कार्यालयात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिरूर नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याधिकारी प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगार दिनानिमित्त नगराध्यक्षा पाचर्णे यांच्या हस्ते नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनीता पोटे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
ज्ञानगंगा स्कूलमध्ये प्रा. डॉ. राजेराम घावटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी माजी प्राचार्य डॉ. गोविंद निंबाळकर यांनी ‘शिक्षण पद्धती व त्यापुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले.


दरम्यान, शहर व परिसरातील विविध शाळांचे वार्षिक निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. निकालानंतर विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. मिठाईच्या दुकानांवर पेढ्यांसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान जनगणना २०२६ संदर्भात नागरिकांना १ ते १५ मेदरम्यान ऑनलाइन ‘सेल्फ एन्यूमरेशन’ पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
