Uncategorizedआरोग्य

महाराष्ट्र दिन निमित्त पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिरूर पोलीस उपविभागात पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. साईदीप सह्याद्री हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासण्या केल्या.

या शिबिरात डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे, डॉ. स्मिता वाघमोडे, डॉ. गौरी कोठारी, डॉ. हेमांगी चव्हाण व अक्षय वाघमोडे यांनी सहभागी होत उपस्थितांची बीपी, शुगर, ईसीजी तसेच रक्त तपासण्या करून आवश्यक समुपदेशन व मार्गदर्शन केले.

शिरूर, रांजणगाव आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांतील सुमारे ११५ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कुटुंबीयांसह या शिबिराचा लाभ घेतला. तसेच पत्रकारांनीही सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पोलीस दलाच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने लोकजागृतीचे अध्यक्ष ओम प्रकाश सतीजा यांना भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button