राष्ट्रीयविशेष

राजमाता अभ्यासिकेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात; यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव


शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24} महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत येथील राजमाता अभ्यासिका शाखा क्रमांक १ चा तृतीय वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत उल्लेखनीय कार्य करत अभ्यासिकेने अनेक विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने मार्गदर्शन केले असून, “विद्यार्थ्यांचा विश्वास हेच आमचे यश” अशी भावना अभ्यासिकेचा संचालिका प्रा.अलका बोरुडे { बेलोटे } यांनी व्यक्त केली.
अभ्यासिकेत एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, वैद्यकीय, पोलीस भरती, लष्कर, जेईई-नीट आदी विविध क्षेत्रातील विद्यार्थी अभ्यासपूर्ण वातावरणात तयारी करत आहेत. या वर्धापनदिनानिमित्त नुकतेच पुणे पोलिस दलात निवड झालेल्या प्रतीक्षा दौंडकर व अजय चाहेर यांचा सत्कार करण्यात आला. महसूल सहाय्यक तुषार रोहकले (पारनेर) यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र दिनी या अभ्यासिका व अकॅडमीचा शुभारंभ सोहळा पार पडला होता.यावेळी माजी सनदी अधिकारी किशोरराजे निंबाळकर, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी अजित देसाई, मुख्याधिकारी अॅड. प्रसाद बोरकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
तीन वर्षांच्या प्रवासात अभ्यासिकेने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेण्याचा संकल्प प्रा. बोरुडे { बेलोटे ) यांनी व्यक्त केला.

डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने लोकजागृतीचे अध्यक्ष ओम प्रकाश सतीजा यांना भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button