शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच मुक्त विद्यापीठाचे मोठे सामाजिक कार्य होय. असे प्रतिपादन मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भाऊसाहेब जाधव यांनी केले.
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने एम.ए.व एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्प व अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाट्न समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य नंदकुमार निकम हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर विभागीय संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड, प्राचार्य डॉ.के.सी .मोहिते, उपप्राचार्य पार.एच.एस.जाधव यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणात डॉ. भाऊसाहेब जाधव यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र् मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थी,
स्त्रीया , शेतकरी, कामगार इत्यादी घटकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जीवन व्यवहार व कौशल्यावर आधारित शिक्षणाची संधी उपल्बध करुन देणे हीच मुक्त विद्यापीठाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. सी.टी. बोरा महाविद्यालय व महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या
केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी भागाच्या तुलनेत दर्जेदार व गुणवत्ताप्रधान शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असून या महाविद्यालयाने अतिशय चांगले संस्कार व उत्तम शैक्षणिक प्रथा-परंपरा जपल्याचे प्रतिपादन केले. पुढे बोलताना डॉ.जाधव यांनी मुक्त विद्यापीठाने एम.बी.ए चा शिक्षणक्रम सुरु करुन ग्रामीण व सर्वसामान्य
विद्यार्थ्यांना व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षणाची संधी दिली असून मोठ्या संस्थांप्रमाणे केवळ पॅकेज मिळविणे नव्हे तर ज्ञान मिळविणे हा या अभ्यासक्रमाचा हेतू असल्याचे मत व्यक्त केले. शैक्षणिक प्रक्रियेत पुस्तकातील सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक व प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड दिल्यशिवाय समाजातील सद्यस्थितीत प्रश्न समजणार नाहीत त्यामुळेच उच्च शिक्षणात समाजाभिमुख संशोधनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
यासाठीच अशा उपक्रमांची गरज असून मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्राने अशी संशोधन कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय नंदकुमार निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले यांच्या पुढाकारातून मुक्त विद्यापीठाची स्थापना झाल्याचे सांगून विद्यापीठाच्या ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीद वाक्यातूनच विद्यापीठाचे ध्येय स्पष्ट होते असे मत व्यक्त केले. मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याची गुणवत्ता विद्यापीठाचा अभ्यासक्रम, समंत्रण सत्रे ,व

विद्यापीठाच्या ब्रीद वाक्यानुसार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या लाखो विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्याचे मुक्त विद्यापीठाचे कार्य महत्वाचे असल्याचे सांगून सी.टी. बोरा महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राने १९९२ पासून गावोगावी व घरोघरी प्रचार-प्रसार करुन शिरुर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य आधारित व्यवसायिक व पारंपरिक अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविले. या शैक्षणिक कार्यातून परिसरातील जवळपास २०० गावांतील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, शिक्षक, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी यांच्या जडणघडणीत सी.टी.बोरा महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन केले.


