गुन्हेगारी

शिरूरमध्ये थरारक प्रकार : तरुणाला मारहाण करून ‘थार’ कार पळवली

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरात शुक्रवारी (दि. १ मे) सायंकाळी घडलेल्या घटनेत एका तरुणाला मारहाण करून त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची ‘थार’ कार जबरदस्तीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश बाबुराव व्हसमनी (वय २७, रा. कोंढापुरी, ता. शिरूर) हे १ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास बाबुरावनगर येथील गंगा ग्रँड हॉटेलसमोर आपल्या ‘थार’ (एमएच १२ वायएस ४४००) गाडीत होते. त्यावेळी आरोपी प्रतिक सांगळे (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व त्याच्या सोबत आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली.

यानंतर आरोपींनी फिर्यादीला गाडीतून खाली ओढून मारहाण केली आणि त्याच्याकडील गाडीची चावी हिसकावून घेत जबरदस्तीने ‘थार’ कार पळवून नेली, असे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९(४), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद २ मे रोजी पहाटे ३.१५ वाजता करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करीत असून, प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे.

डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने लोकजागृतीचे अध्यक्ष ओम प्रकाश सतीजा यांना भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button