अपघात

न्हावरे रोडवर कारचा अपघात; महिलेला मृत्यू

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24: }शिरूर तालुक्यातील निर्वी-न्हावरे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या पतीस गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवार (दि. २९ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास नानाभाऊ इथापे यांच्या ताब्यातील टोयोटा कंपनीची लीव्हा (एमएच १४ डीएन ४०९१) ही कार निर्वी-न्हावरे रोडवर सिताराम सात्रस यांच्या घरासमोरील झाडाला जोरदार धडकली. या अपघातात कारमधील शोभा रामदास इथापे (वय ५५, रा. लोहगाव, पुणे) यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, न्हावरे येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शोभा इथापे यांना मृत घोषित केले. त्यांच्या पती रामदास इथापे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (क्र. ६४/२०२६) करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button