पुणे जिल्हा
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24},: शहरातील प्रलंबित नागरी सुविधांच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार या सोमवारपासून बेमुदत उपोषणास बसणार आहेत. शिरूर तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता या आंदोलनास प्रारंभ होणार असून, विविध समाजोपयोगी मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात येत आहे.


