राष्ट्रीय

नसरापूर घटनेच्या निषेधार्थ शिरूरमध्ये आंदोलन तहसील कार्यालयास सोमवार दिनांक ४ मे रोजी निवेदन देणार


शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या बालिकेवरील अत्याचार व हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शिरूर शहरात आज, सोमवार (दि. ४ मे) जाहीर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता शिरूर तहसील कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने निषेध नोंदवून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button