महाराष्ट्र

शिरूरला उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रिया बिरादार यांचे बेमुदत उपोषण सुरू

शिरूर { डेली पोस्ट न्यूज  टीम 24 : शहरातील प्रलंबित नागरी सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप महिला आघाडीच्या शिरूर शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. उपजिल्हा रुग्णालयासह विविध मूलभूत मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन छेडले आहे.

शहरात १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. यासोबतच, चुकीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम भूमिका बिरादार यांनी मांडली.

तसेच, शहर व तालुक्यात अधिकृत शासकीय आधार केंद्रे सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्या कार्यरत सीएससी केंद्रांवरील सेवा शुल्काबाबत पारदर्शकता राखावी, तसेच शासनाने निश्चित केलेले शुल्क फलक दर्शनी भागात लावण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. बंद असलेल्या आधार केंद्रांबाबत जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रशासनाने या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बिरादार यांनी दिला आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे,  भाजपचे नेते संजय पाचंगे तर्डोबावाडीच्या माजी सरपंच वर्षा काळे, सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी, प्रितेश फुलडाळे,  भाजपचे राजू शेख, विजय नरके,सविता बोरुडे, उषा वाखारे, प्रीती बनसोडे, ज्योती हांडे, हिराबाई अडसूळ, भारती शहाणे, जनाबाई मल्लाव, सुजाता पाटील, निलू शर्मा, श्रुतिका झांबरे, अश्विनी नरवडे आदींनी भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button