महाराष्ट्रशैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल शिरूरची एनएमएमएसमध्ये यशाची परंपरा कायम; २७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची परंपरा यंदाही कायम राखली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेतील तब्बल २७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

यंदा परीक्षेसाठी शाळेतून एकूण ५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांनी यश मिळवत सुमारे ५० टक्क्यांहून अधिक निकालाची नोंद केली आहे. पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शुभम आगलावे, कु. राजनंदिनी चव्हाण, कु. अनुष्का सावंत, दर्शन चौरे यांच्यासह इतर गुणवंतांचा समावेश आहे. त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक एस.एच. मचाले आणि पर्यवेक्षक ए.के. सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विषयानुसार शिक्षकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांचा मोठा वाटा आहे. मराठी विषयासाठी ए.एस. वाजे, इंग्रजीसाठी एस.एस. शेख, बुद्धिमत्तेसाठी एस.जी. साबळे, गणितासाठी एल.एस. रोडे, विज्ञानासाठी एस.ए. रासकर आणि समाजशास्त्रासाठी एस.डी. इसवे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

याशिवाय रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकिर खान पठाण यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ आणि शिक्षक-पालक संघाकडून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.

डेली न्यूज पोस्ट २४ च्या वतीने लोकजागृतीचे अध्यक्ष ओम प्रकाश सतीजा यांना भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button