Uncategorizedराष्ट्रीय

शिरूर तालुक्यात तीन बिबटे जेरबंद

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}मागील दोन दिवसात तीन बिबटे जे्रबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.त्यातील पिंपळे धुमाळ येथील पिंजऱ्यात एकाच वेळेस दोन बिबटे जेरबंद झाले. त्यात अंदाजे पाच वर्षाची बिबट मादी व तीच्या दीड वर्षाच्या पिल्लूचा समावेश असून संविदणे येथे एक बिबटया असे एकूण तीन बिबटे जे्रबंद झाले आहेत.

शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ५० हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे.

दरम्यान आज पहाटे(११ मे) साडेपाच च्या दरम्यान दरम्यान पिंपळे धुमाळ येथील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ५ वर्षे वयाची बिबट मादी आणि १.५ वर्षाचे तिचे पिल्लू अडकले. दोघांची जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे रवानगी करण्यात आली.

शनिवार दिनांक ९ मे रोजी संविदणे येथे अशोक मुलानी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे ७-८ वर्षे वयाची बिबट मादी अडकली. तिला जुन्नर येथे माणिकडोह निवारा केंद्र येथे पाठविण्यात आले असल्याचे तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.

दरम्यान यापूर्वी ४ एप्रिल २०२६ रोजी पिंपळसुटी येथे एकाच वेळी दोन बिबट जेरबंद झाले होते. . त्यातील नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे होते.

बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button