क्रीडा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी जगदीश विवेकानंद महाजन याचे घवघवीत यश

शिरूर : ( डेली न्यूज पोस्ट टीम 24}गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या ५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शिरूरच्या आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी जगदीश विवेकानंद महाजन याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २०० मीटर धावणे या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक, तर १०० मीटर धावणे या स्पर्धेत रौप्यपदक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.

या दमदार कामगिरीच्या जोरावर जगदीशची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याच्या यशामुळे शिरूर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  धरमचंद फुलफगर, सचिव  नंदकुमार निकम, शालेय समितीचे अध्यक्ष  शिरीष बरमेचा तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. अश्विनी घारू यांनी जगदीशचे अभिनंदन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

जगदीशच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button