राष्ट्रीयविशेषसामाजिक

मास्तर… आशेचे दीप प्रज्वलित करणारे व्यक्तिमत

oplus_131074

       काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांच्या सहवासानेच जीवनाला नवी दिशा मिळते. दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रमुख यजुर्वेंद्र महाजन अर्थात आपल्यास र्वांचे लाडके “मास्तर” हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.

आज मास्तर शिरूर शहरात आले आणि त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या मनात नव्या आशा, नवी ऊर्जा आणि नव्या स्वप्नांची ज्योत प्रज्वलित झाली. समाजातील वंचित, दिव्यांग, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे महान कार्य ते गेली अनेक वर्षे अविरतपणे करत आहेत. ज्यांच्या आयुष्यात परिस्थितीने अंधार निर्माण केला, अशा हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात मास्तरांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचा दीप लावला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अण्णा हजारे यांच्या प्रतिष्ठानतर्फे राळेगणसिद्धी येथे प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर समाजपरिवर्तनासाठी झटणाऱ्या विचारांचा आणि सेवाभावाचा गौरव आहे. हा पुरस्कार मास्तरांच्या कार्याची समाजाने केलेली कृतज्ञ दखल आहे.

प्रचंड सकारात्मक ऊर्जा, अथक परिश्रम, माणसांविषयी अपार प्रेम आणि इतरांचे जीवन सुंदर व्हावे ही निस्वार्थ भावना यामुळे मास्तर अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दातून जगण्याची नवी उमेद मिळते, प्रत्येक कृतीतून संघर्षावर मात करण्याची प्रेरणा मिळते आणि प्रत्येक भेटीतून जीवन अधिक अर्थपूर्ण बनविण्याची शक्ती मिळते.

पुणे येथे दिव्यांग आणि वंचित बांधवांसाठी उभारण्यात येत असलेले भव्य शैक्षणिक संकुल हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहे. हे स्वप्न लवकरात लवकर पूर्णत्वास जावो आणि त्यातून लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून निघो, हीच सदिच्छा.

मास्तर, आपण शिरूरमध्ये येऊन आम्हाला भेट दिलीत, आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्या विचारांचे अमृत पाजलेत, यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या कार्याला सलाम, आपल्या विचारांना प्रणाम आणि आपल्या सेवाभावी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा.

आपण खऱ्या अर्थाने आशेचे दीप प्रज्वलित करणारे, संघर्षाला सामर्थ्यात रूपांतरित करणारे आणि मानवतेचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व आहात. समाजाला अशा दीपस्तंभांची आज अधिक गरज आहे.

असे हे महाजन सर नुकतेच शिरूर शहरात आले होते. त्याचे स्वागत हॉटेल व्यवसायिक चंद्रकांत चोपडा, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदीप बारवकर, बांधकाम व्यवसायिक संदीप बिहाणी, प्रा. चंद्रकांत धापटे,प्राचार्य डॉ. समीर ओंकास, संतोष झांबर व्यवसायिक विनोद बोथरा राहुल बोरा यांनी केले. राजमाता अभ्यासिकेच्या प्रा. अलका बेलोटे व नारायण बोरुडे यांच्या वतीनेही महाजन यांचा सन्मान करण्यात आला

 यावेळी बोलताना महाजन यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांकरिता पुणे येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

oplus_131074

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button