विशेष

पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण; विधी बोथरा यांचा विविध संस्थांकडून सन्मान

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर शिरूरच्या विधी विनोद बोथरा यांनी सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिरूर शहरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लब शिरूरचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते विधी बोथरा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य अमोल शहा, माजी सनदी अधिकारी प्रभाकर गावडे, प्रा. डॉ. राजेराम घावटे आणि समुपदेशिका प्रिया लंघे उपस्थित होत्या.

रसिक विचार मंच शिरूर व विद्याधाम प्रशाला सन १९९३ बॅचच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही विधी बोथरा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बांधकाम व्यावसायिक संदीप बिहाणी, सामाजिक कार्यकर्ते बिजवंत शिंदे, माजी उपसरपंच संभाजी कर्डीले, दादा चौधरी, प्रशांत थोरात, मुकेश संघवी,प्रा. सतीश धुमाळ,अतुल बोथरा, विनोद बोथरा, दिलीप शेख आणि संजय कांतीलाल बाफना उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विशेष समारंभात नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या हस्ते विधी बोथरा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेविका चारूशिला कोळपकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर, बाळासाहेब झाडगे, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, इंद्रभान कळमकर आणि राजू मैड उपस्थित होते. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर यांनीही विधी बोथरा यांचे अभिनंदन केले.

विधी बोथरा यांनी अकरावी-बारावी तसेच बी.कॉम.चे शिक्षण पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील थोरात अँड ओस्तवाल असोसिएट्स येथे सीए आर्टिकलशिप पूर्ण करून त्यांनी सनदी लेखापाल होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सीए अंतिम परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.

डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने विकासजी सुवालालजी पोखरणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

विधी या शिरूरमधील प्रतिष्ठित बोथरा परिवारातील असून त्या दिवंगत व्यापारी स्व. सुभाषलालजी बोथरा व कंचनबाई बोथरा यांच्या नात आहेत. तसेच ऑल इंडिया श्वेतांबर जैन कॉन्फरन्सचे सदस्य कांतीलालजी बोथरा यांच्या नात, व्यापारी दिनेश बोथरा व सामाजिक कार्यकर्ते राहुल बोथरा यांच्या पुतणी, तर विनोद व दीप्ती बोथरा यांच्या कन्या आहेत.

सीएसारख्या आव्हानात्मक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविलेले हे यश ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे विधी बोथरा यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button