Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर शहरातील अंगणवाड्यांमधील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी संबंधित अंगणवाड्यांना अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, मुदत संपलेले मसाले वापरल्याचा संशय आणि अन्न तयार करण्यातील निष्काळजीपणा
आढळून आल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.







