राष्ट्रीय
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -२4}यंदाच्या मान्सूनने शिरूर तालुक्यात दमदार हजेरी लावली असून ८ जुलै २०२६ पर्यंत तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. तालुक्याचे सरासरी (नॉर्मल) पर्जन्यमान ७२.५ मिमी असताना प्रत्यक्षात १४५ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे.त्याच बरोबर चिंचणी येथील घोड धरणात ०•६ टीएमसी पाणी आले असल्याचे शाखा अभियंता वैभव काळे यांनी सांगितले.

मांडवगण फराट्यातील फराटवाडी येथील पूल पाण्याखाली गेला होता परंतु सद्यस्थितीत त्या पुलावरील वाहतूक सुरू आहे. सादलगाव येथील झोपड्यांमध्ये पाणी शिरले तर एका पत्राशेड गोठ्याचे नुकसान झाले आहे. मुखई येथील दोन के.टी .बंधाऱ्यावरील पूल व जातेगाव बुद्रुक व जातेगांव खुर्द येथील पुलावर पाणी आल्याने या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली आहे. टोकाची वाडी येथील ठाकर वस्तीवरील 26 कुटुंबातील 59 जणांचे अस्मिता भवन येथे स्थानांतर करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून शिरूर तालुक्यातील विविध गावात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात माहितीचे संकलन सुरू करण्यात आले असल्याचे गोसावी यांनी सांगितले.



