Uncategorized
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: विविध नागरी प्रश्न, कथित अनियमितता आणि ठेक्यावरील सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शनिवारी मागे घेण्यात आले.
बजावण्यात आलेल्या ८८ लाख रुपयांच्या दंडाबाबत पुढील कार्यवाही, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया न केल्याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई, तसेच खतखड्डा विल्हेवाट प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

