Uncategorized

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर येथे अभिवादन व मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात अभिवादन करण्यात आले.

शहरातील पक्षाच्या कार्यालयात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून अनेक विकासाचे प्रकल्प साकार झाले आहेत. सर्व सामान्य माणसा साठी विविध जनकल्याणाचा योजना त्यांनी मार्गी लावल्या अश्या शब्दात पाचर्णे यांनी अभिवादन केले.

रयत शाळा न्यू इंग्लिश स्कूल शिरूर येथे रयत शिक्षण मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी उपनगराध्यक्ष जाकिर खान शाहि खान पठाण यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पठाण यांनी अजित दादा पवार यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दलची माहिती दिली.

यावेळी नगरपालिकेचे सभापती स्वाती साठे, सभापती सुनिल जाधव, एजाज बागवान, उपसभापती आयेशा सय्यद, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजित पाचर्णे,निलेश गाडेकर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या श्रुतिका झांबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार, माजी सभापती संतोष शितोळे, रंजन झांबरे आदी यावेळी उपस्थित होते.

शिरूर नगरपरिषद येथे ही नगरध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

शिरूर-हवेली मतदारसंघात ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या पुढाकारातून तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही शिबिरे होणार आहेत.

या शिबिरांमध्ये रक्तगट व रक्तशर्करा तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, माता व बाल आरोग्य सेवा, असंसर्गजन्य आजार (एनसीडी) तपासणी, आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण, आरोग्य जनजागृती व समुपदेशन तसेच गंभीर रुग्णांना उच्चस्तरीय उपचारासाठी संदर्भ (रेफरल) अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिरांचे आयोजन सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत करण्यात आले असून, शिरूर ग्रामीण रुग्णालयात २३ जुलै, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात २४ जुलै आणि न्हावरे ग्रामीण रुग्णालयात २६ जुलै रोजी आरोग्य तपासणी शिबिरे होणार आहेत.

आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त डेली न्यूज पोस्ट च्या वतीने विनम्र अभिवादन

आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, स्वतःसह आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध होणार असून, आजारांचे वेळेत निदान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button