राष्ट्रीय

क्रांती दिनानिमित्त शिरूरमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचा जागर

हुतात्मा स्मारकाला अभिवादन; रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान, महिलांची मोफत आरोग्य तपासणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक क्रांती दिनाचे औचित्य साधून लोकजागृती चळवळीच्या वतीने शिरूरमध्ये विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. क्रांती चौकातील हुतात्मा स्मारकावर शहीद हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर आणि महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले.

क्रांती चौकातील हुतात्मा स्मारकावर झालेल्या अभिवादन कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गदिया, लोकजागृती चळवळीचे रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, जाकिरखान पठाण, पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनीता पोटे, पांडुरंग थोरात, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेविका स्वप्ननाली जामदार, नगरसेविका चारूशिला कोळपकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सकल जैन समाज संघाचे प्रकाश बाफना, निलेश नहार, शितल नहार, साबीरभाई शेख,  मोहम्मद हुसेन पटेल,संपत लोखंडे, बिजवंत शिंदे, प्रा. चंद्रकांत धापटे, संजय बांडे, डॉ. दीपक गायकवाड, संदीप कडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी दीपक घारू, विलास गोसावी, सुकुमार बोरा, संजय बारवकर, दत्ता शिंदे, जयवंत साळुंखे, रामदास राऊत, बंडू लोखंडे, विक्रम पाचंगे, संजय बाफना, संजय कवठाळे, योगी सतीजा, राजेंद्र सतीजा, दगडू जाधव, डॉ. अतुलकुमार बेंद्रे, तारूअक्का पठारे, राहुल पिसाळ, चंद्रकांत पठारे, भगवान दळवी, सुभाष जैन, माजी नगरसेविका माया गायकवाड, रमणलाल भंडारी, श्रेणिक नहार, डॉ. अखिलेश राजुरकर, रामभाऊ इंगळे, डॉ. संतोष पोटे, योगेश जामदार, तुषार वेताळ, गंगाधर तोडमल, राजेंद्र मोरे, अजिम सय्यद आदी उपस्थित होते.

३४वे रक्तदान शिबिर; ४० जणांचे रक्तदान

क्रांती दिन तसेच आचार्यश्री आनंदऋषी महाराज यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त ३४व्या रक्तदान शिबिराचे आयोजन शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात करण्यात आले. या शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे पुष्कर सुकुमार बोरा यांनी ३६व्यांदा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या रक्तदान शिबिरासाठी सह्याद्री ब्लड बँकेने रक्तसंकलनाचे काम केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

१०० हून अधिक महिलांची आरोग्य तपासणी

याचवेळी महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०० हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी आलेल्या महिलांना तपासणी कार्ड देण्यात आले.

या उपक्रमासाठी डॉ. वैशाली साखरे, सौ. सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, शशिकला काळे आणि शितल शर्मा यांनी सहभाग घेतला. शिरूर ग्रामीण रुग्णालयाने या आरोग्य तपासणी उपक्रमासाठी सहकार्य केले.

क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादनासोबतच रक्तदान आणि महिलांच्या आरोग्य तपासणीसारखे उपक्रम राबवून देशभक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न लोकजागृती चळवळीच्या माध्यमातून करण्यात आला.

 लोक जागृती चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ ओम प्रकाश सतीजा यांचे नुकतेच निधन झाले लोक जागृती चळवळीसह शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना यांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला ओम प्रकाश सतीजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यांच्या आठवणीने अनेकांना अश्रू अनावर झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button