Uncategorizedलेखसंपादकीय
विचारांची ज्योत तेवत ठेवणारा ‘सनशाईन सॅटर्डे क्लब’
शहराचा विकास मोजताना आपण रस्ते, इमारती, उद्योग, पायाभूत सुविधा यांचा विचार करतो. मात्र, शहराच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो तो तेथील नागरिकांच्या वैचारिक समृद्धीतून. विविध क्षेत्रांतील माणसे एकत्र येतात, अनुभवांची देवाणघेवाण करतात,
प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा करतात आणि नव्या पिढीला प्रेरणा देतात, तेव्हा शहराचे सामाजिक विश्व अधिक समृद्ध होत जाते. शिरूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला ‘सनशाईन सॅटर्डे क्लब’ हा याच वैचारिक समृद्धीचा अनुभव देणारा उपक्रम ठरला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि शिरूरचे सुपुत्र किशोरराजे निंबाळकर यांच्या पुढाकारातून ऑगस्ट २०२४ मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक जबाबदाऱ्यांच्या धावपळीतही वैचारिक संवादासाठी वेळ काढत विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एका व्यासपीठावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आज शिरूरच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होणारी ही बैठक म्हणजे केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम नाही. येथे अनुभव बोलतात, प्रश्न उपस्थित होतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि अनेकदा नव्या दिशांचा शोध घेतला जातो. प्रशासन, शिक्षण, साहित्य, इतिहास, उद्योग, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कार्य,
ग्रामविकास, सहकार अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या मंचावर संवाद साधल्याने त्याचा आवाकाही सातत्याने विस्तारला आहे.
गेल्या दोन वर्षांत संयुक्त राष्ट्रसंघात अधिकारी म्हणून कार्य केलेले डॉ. शिरीष रावण, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य व माजी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, ‘वेंगुर्ला पॅटर्न’चे जनक रामदास कोकरे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, असीम फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी, पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे, डेप्युटी कमिशनर व लेखक राजीव नंदकर, पद्मश्री सरपंच पोपटराव पवार



मतभिन्नता असली तरी समोरच्या विचारांचा आदर करीत संवाद साधण्याची संस्कृती रुजवणे, हा या उपक्रमाचा गाभा आहे.

