निधन वृत्त

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभनाताई रावसाहेब पाचंगे यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभनाताई रावसाहेब पाचंगे (वय ७४) यांचे शनिवारी (दि. १५) सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिरूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत श्रद्धांजली अर्पण केली.

शोभना पाचंगे यांनी शिरूरच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी शिरूर नगरपरिषद शाळेत शिक्षिका म्हणून सेवा बजावली. त्यानंतर महिलांचे संघटन करून इंदिरा महिला पतसंस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले.

शिरूर पोलीस ठाण्यातील महिला दक्षता समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी मागील काही वर्षे कार्य केले. तसेच छत्रपती संभाजी गणेश मित्र मंडळ, हुडको कॉलनीच्या मार्गदर्शक म्हणून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना मार्गदर्शन केले. शनिवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त शिरूर तहसील कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासही त्या उपस्थित होत्या. त्यानंतर सायंकाळी त्यांचे आकस्मिक निधन झाले.

व्यावसायिक उदय पाचंगे व विक्रम पाचंगे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अंत्ययात्रा रविवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता हुडको कॉलनी { छत्रपती संभाजी नगर ) शिरूर येथून अमरधाम स्मशानभूमी शिरूर येथे जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button