क्राईम

औषधे घेण्यासाठी पेशंटला मेडिकल मध्ये का पाठवत नाही या कारणावरून डॉक्टरला मारहाण

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४) – शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट 2025) रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांणी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय 30, व्यवसाय डॉक्टर, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळगाव गेवराई, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. शितोळे हे आपल्या शितोळे क्लिनिक या दवाखान्यात काम करत असताना आरोपी रवींद्र शिरसाठ (रा. बाबुराव नगर, शिरूर) हा तिथे आला. त्याने “आमच्या मेडिकलमध्ये पेशंटला औषधे घेण्यासाठी का पाठवत नाहीस?” असा जाब विचारत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर त्याने डॉक्टर शितोळे यांना हाताने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता शिरसाठ याने कमरेचा बेल्ट काढून डॉक्टरवर प्रहार करून दुखापत केली.

या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 603/2025 भा.न्या.सं.का. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पो.हवा. भगत (बॅ. नं. 1964) यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button