महाराष्ट्र

निळकंठ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विकास रासकर तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजीराव भापकर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील निळकंठ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विकास रासकर यांची, तर व्हाईस चेअरमनपदी वडूलेचे माजी सरपंच शिवाजीराव आबासाहेब भापकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे पिंपळनेर परिसरातील सहकार क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हाईस चेअरमनपदी निवड झालेले शिवाजीराव भापकर हे अनुभवी सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, प्रगतीशील शेतकरी आणि व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच वडूले ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि ग्रामविकासातील कार्यामुळे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक सुरेंद्र पठारे, पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लंटाबळे, माजी चेअरमन राजेंद्र पठारे, संपतराव पठारे, अशोकराव लंटाबळे, वाघमोडे साहेब, माजी सचिव वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, विकास रासकर आणि शिवाजीराव भापकर यांच्या निवडीबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, शिवसेना नेते सुजितराव झावरे, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथराव कोरडे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने विकासजी सुवालालजी पोखरणा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

 

नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अधिक प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button