



खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी समाजमाध्यमांद्वारे निवड झालेल्या सहा विद्यार्थिनींची नावे जाहीर केली असून त्यामध्ये अनघाचा समावेश आहे.
तसेच शिरूर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रशांत शिंदे आणि समर्थ पॅथॉलॉजीचे उदय शिंदे यांची ती पुतणी आहे.

मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळणे हा अनघासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. “सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. त्यांच्या कार्यामुळेच आज आम्हा मुलींना शिक्षण घेता येत आहे,” अशा भावना अनघाने व्यक्त केल्या.
शिरूरकरांसाठी अभिमानाची ठरत आहे. तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थिनींना नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
