शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषदेच्या सन २०२५च्या येत्या निवडणुकीत लोकशाही क्रांती आघाडी पॅनल उभे करणार नसल्याची महत्वाची घोषणा लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी केली.
शिरूर नगरपालिकेची डिसेंबर २०२५ ला निवडणुक होत आहे. ही निवडणूक लढविण्या संदर्भात राजकीय पक्षा मध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकशाही क्रांती आघाडीने शिरूर नगरपरिषदेची निवडणूक मोठया ताकदीने लढविली होती व एक नगरसेवक ही निवडून आला
होता. या पार्शवभूमीवर यंदाची पालिका निवडणूक लोकशाही क्रांती आघाडी लढविणार का याकडे राजकीय वर्तुळा चे लक्ष लागले होते.

दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी लोकशाही क्रांती आघाडीच्या संस्थापक सदस्य व कार्यकरीणीची बैठक झाली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीत काय भूमिका घ्यावी या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
सद्यस्थिती चा विचार करिता शिरुर नगर परिषद निवडणूक-2025 करिता आघाडी पॅनल उभे करणार नाही असा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला रवींद्र धनक, अँँड.ओमप्रकाश सतेजा, किसनराव जाधव, माजी नगरसेवक मंगेश खंlडरे,मोहम्मद हुसेन पटेल,अँड. सतीश गवारी,संजय बांडे आणि अँड विक्रम पाटील उपस्थित होते.



