विशेष
पीएसआय म्हणून जितेंद्र पानसरे यांना प्रमोशन
माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर व संदिप बिहाणी यांचा हस्ते सत्कार

शिरुर दिनांक – शिक्रापूर पोलीस ठाण्यातील जितेंद्र पानसरे यांची पदोन्नती होवून ते पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय ) झाले आहेत .
पानसरे यांची कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून ओळख आहे . यापूर्वी त्यांनी शिरुर , जुन्नर , यवत , याठिकाणी काम केले आहे .पदोन्नती बद्दल नूकताच पानसरे यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर व माहेश्वरी समाज शिरुरचे संदिप बिहाणी यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी माजी उपसरपंच गणेश खोले , व्यवसायिक गोपीनाथ पठारे आदी उपस्थित होते .

