विशेष

ढोल ताश्याचा गजरात व छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या जयघोषात शिवजयंती साजरी

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा वतीने पंचायत भवन जवळ अभिवादन सभा

 

शिवजयंतीनिमित्त शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने अभिवादन करताना

शिरुर दिनांक ( वार्ताहर )ढोल ताश्याचा गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या  जयघोषात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिरुर येथे अभिवादन करण्यात आले .

शिवसेना( उध्द्वव बाळासाहेब ठाकरे ) च्या वतीने पुणे नगर रस्त्यावरील पंचायत भवन जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी अभिवादन सभेस   शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख ,माजी उपसभापती पांडृरंग थोरात, माजी सभापती प्रभूलिंग वळसंगे  मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , माजी नगरसेवक मंगेश खांडरे  ,कॉग्रेस आयचे संतोष गव्हाणे , माजी शहरप्रमुख कैलास भोसले , तालुका संघटक शकिल खान ,ज्येष्ठ शिवसैनिक खूशाल गाडे, सुनील चौधरी  ,राजेंद्र शिंदे  , उप शहर प्रमुख महादेव कडाळे ,उपशहरप्रमुख  संतोष पवार ,भरत गाडेकर ,   माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे , समता परिषदेचे किरण बनकर ,नोटरी रवींद्र खांडरे , योगेश महाजन ,रमेश दसगुडे ,माजी मुख्याध्यापक  बाळासाहेब गायकवाड  भाजपाचे प्रवीण मुथा , भूमीपूत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे , निवेदक रावसाहेब चक्रे , राजेंद्र देशमुख ,हरिभाउ वीर , अर्जून निचित , सुनील बोरा , विलास गोसावी, प्रकाश बाफना आदी उपस्थित होते .

याप्रसंगी हिंगणी येथील वीर योध्दा एकलव्य   ढोल ताथा पथक यांच्या ढोल ताश्या वादनाने परिसर दणाणून गेला .
संदेश केंजळे म्हणाले की शिवजयंतीनिमित्त निबंध स्पर्धा , क्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे . छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते व लोककल्याणकरी राज्य कारभार त्यांनी केला .
शहरप्रमुख संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले . त्यात त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी  समाजातील सर्वाना बरोबर घेवून स्वराज्याची निर्मिती केली .
ॲड .सुभाष पवार म्हणाले की  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनुकरण करावे .
यावेळी नामदेवराव घावटे , प्रभूलिंग वळसंगे , पोपटराव शेलार यांची भाषणे झाले .आभार प्रकाश बाफना यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button