विशेष
तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरातील ८ महिलांना शिवदुर्गा सन्मान पुरस्कार
जिल्हा संपर्क प्रमुख गीतांजली ढोमे , विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , शहरप्रमुख मयूर थोरात व नामदेवराव घावटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण



शिरुर(वार्ताहर )
तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने शहरातील ८ महिलांचा शिवदुर्गा सन्मान पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला .

जुन्या नगरपरिषद कार्यालया जवळ शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले .यावेळी पुणे जिल्हा शिवसेनेच्या संपर्क प्रमुख गीतांजली ढोमे , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , तालुका संघटक सुरेश गाडेकर , महिला आघाडीच्या सुजाता पाटील , अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद महाराज जोशी , भरत जोशी आदी उपस्थित होते .या कार्यक्रमात हॉटेल व्यवसायिका सुलोचना रामदास गिरमकर, ,वात्सल्यसिंधू फाउंडैशनच्या उषाताई शैलैश वाखारे , आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , जिम चालक व हॉटेल व्यवसायिका प्रिया बिरादार ,ऑक्टिव्ह सोशल गृपच्या कामिनी बाफना , ॲड . सोनाली अच्छा , पोलीस कॉन्स्टेंबल प्रतिभा देशमुख , डॉ . किर्ती मदने या महिलांचा सन्मान शिवदुर्गा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला .

गीतांजली ढोमे यावेळी म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणूकीनुसार जीवन आचरावे . छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिरुर परिसरातील महिलांचा शिवदुर्गा पुरस्कार देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे . .शिरुर शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत पाठ
पुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . शिवाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले .

माजी नगरसेवक विनोद भालेराव म्हणाले की शिवजयंती निमित्त विचाराचा जागर करावा .
ॲड. सुभाष पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावची शिकवण दिली .नामदेवराव घावटे यांचे ही भाषण झाले .स्वागत व प्रस्ताविक शहरप्रमुख मयूर थोरात यांनी केले . सुरेश गाडेकर यांनी आभार मानले .


