विशेष

जिल्हा परिषद आंतरशालेय नाट्य स्पर्धेत शिरूर येथील आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या द्वितीय क्रमांक

प्राचार्या अश्विनी घारु यांना तालुका व जिल्हास्तरीय उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. तर विद्यार्थिनी नक्षत्रा पटवर्धन हिला तालुका व जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभिनय, तसेच अनुष्का तंटक हिला जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24):जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद आंतरशालेय नाट्य स्पर्धेत शिरूर येथील आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलने आपल्या प्रभावी सादरीकरणाने लक्षवेधी यश संपादन केले. “वाचाल तर वाचाल” या सामाजिक आशय असलेल्या नाटकाने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय पारितोषिक पटकावले.

ही स्पर्धा पुणे येथील रामचंद्र राठी माध्यमिक विद्यालय येथे पार पडली. वाचनाचे महत्त्व, मूल्यशिक्षण आणि समाजप्रबोधन या विषयावर आधारित नाटकाने परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली.

या स्पर्धेत शाळेच्या प्राचार्या अश्विनी घारु यांना तालुका व जिल्हास्तरीय उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. तर विद्यार्थिनी नक्षत्रा पटवर्धन हिला तालुका व जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभिनय, तसेच अनुष्का तंटक हिला जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर झाले.

नाटकाचे दिग्दर्शन प्राचार्या अश्विनी घारु, सहाय्यक दिग्दर्शन सायली पटवर्धन यांनी केले. नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनी, रंगभूषा, नृत्यदिग्दर्शन आदी सर्वच विभागांत शिक्षक व विद्यार्थ्यांनी संघभावनेने काम करत नाटकाला व्यावसायिक उंची मिळवून दिली.

नाटकातील विविध भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपल्या अभिनय कौशल्याने नाटकाला जिवंतपणा दिला. सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचवत मनोरंजनाची जोड देणारे हे नाटक स्पर्धेतील ठळक आकर्षण ठरले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, शाळा समिती अध्यक्ष शिरीष बरमेचा, संस्थेचे सचिव नंदकुमार निकम , प्रशासकीय अधिकारी देशपांडे तसेच प्राचार्या अश्विनी घारु यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही शाळा सातत्याने उज्ज्वल कामगिरी करत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button