शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र उत्तम नरवडे यांची तर उपसभापदी बाळासाहेब अर्जूनराव नागवडे यांची बिनविरोध निवड

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट -24 टीम )
शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी विद्यमान सभापती राजेंद्र उत्तम नरवडे यांची तर विद्यमान उपसभापदी बाळासाहेब अर्जूनराव नागवडे यांची बिनविरोध निवड झाली .
विधानसभा निवडणूकीनंतर होत असलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस की राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्ष बाजी मारणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले होते . यापूर्वी खरेदी विक्री संघावर माजी आमदार ॲड . अशोक पवार यांचे वर्चेस्व होते . खरेदी विक्री संघाचा निवडणूकीत १७ जाग्या पैकी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या १०जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या . तर २ संचालक माजी आमदार अशोक पवार यांचे निवडून आले होते . त्यानंतर ५ जाग्यासाठी निवडणूक झाली . त्यात ५ ही जण अशोक पवार यांचे निवडून आले होते . यामुळे खरेदी विक्री संघाचा निवडणूक चुरशीची होईल असे बोलले जात होते.
प्रत्यक्षात सभापती व उपसभापदी पदाचा निवडी बिनविरोध झाल्या .
खरेदी विक्री संघाचा निवडणूकी पूर्वी विद्यमान सभापती राजेंद्र नरवडे हे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार ॲड . अशोक पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये दाखल झाले होते .
आज सभापती पदाचा निवडीकरीता राजेंद्र नरवडे व उपसभापतीपदा करीता बाळासाहेब नागवडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्याच्या निवडी बिनविरोध झाल्या .
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे ,कात्रज जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्ननील ढमढेरे ,जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्ननील गायकवाड , बाजार समितीचे माजी सदस्य आबाराजे मांढरे , पक्ष निरीक्षक अण्णा महाडिक , आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , शिरुर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , राजेंद्र गावडे , पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे , माजी सभापती शरद कालेवार ,माजी सरपंच प्रकाश थोरात , श्रीनिवास घाडगे ,तज्ञिका कर्डिले , शृतिका झांबरे आदी उपस्थित होते .
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्याचा संकल्प सर्वानी केला होता व तसे वर्चस्व निर्माण केले .अलीकडचा काळात राजकारण्यात द्वेष वाढत चालला आहे .अशी खंत व्यक्त केली .
खरेदी विक्री संघाचा कार्याचा नवीन इतिहास नूतन पदाधिकारी यांनी घडवावा . खरेदी विक्री संघाची निवडणूक सर्वानी एकत्रित लढली तशीच आगामी काळात बाजार समितीची निवडणूक एकजीवाने लढवावी असे आवाहन केले .
तालुकाध्यक्ष रवि काळे म्हणाले की खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीने वर्चस्व निर्माण केले . आदर्श असे काम खरेदी विक्री संघ ५ वर्षात करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . न्हावरा येथे खरेदी विक्री संघाच्या जागेत व्यापारी संकुल उभारावे असे आवाहन त्यांनी केले .
नूतन सभापती राजेंद्र नरवडे म्हणाले की पक्षाने सभापदी पदाची संधी दिली त्या संधीचे सोने करु . पक्षाशी प्रामाणिक राहिल व चांगला असा आदर्श खरेदी विक्री संघ शिरुरचा करेल .
निवडी नंतर उपसभापती बाळासाहेब नागवडे म्हणाले तीसरा वेळेस उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडेल .
जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे म्हणाले की राज्यात महायुतीचे सरकार असून तालुक्यातील निवडणूकीना महायुतीतील सर्व पक्ष एकत्रित सामोरे जातील .
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार , निवडणूकी करीता निरीक्षक म्हणून आलेले आण्णासाहेब महाडिक , संचालक सुरेश ढवळे आदीची भाषणे झाली . आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी मानले .