महाराष्ट्र

प्रहार शिरुर तालुका प्रमुख म्हणून अमोल खंडेराव माळवदकर यांची निवड .

शिरुर (  डेली न्यूज पोस्ट टीम -24 )प्रहार शिरुर तालुका प्रमुख म्हणून निर्वी , ता . शिरुर येथील अमोल खंडेराव माळवदकर यांची निवड करण्यात आली आहे .
निवडी नंतर बोलताना माळवदकर यांनी सांगितले की प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू व महाराष्ट्र राज्याचे प्रहार दिव्यांग क्रांती पक्षाचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव सर यांच्या मार्गदर्शनाखाली
शिरूर तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनी , विधवा महिला ,अनाथ गोरगरीब इत्यादींच्या न्याय हक्कासाठी तालुका स्तरावर प्रहार पक्षा चे मार्फत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व गोरगरिबांवरती होत असलेला अन्याय रोखण्यासाठी व पक्ष मजबूत करण्यासठी काम करणार आहे .
शिरूर तालुक्यातील 119 गावांमधील प्रत्येक गावामध्ये गाव तिथे प्रहार संघटनेची शाखा व बचत गट सुरु करून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच गाव पातळीवरचे प्रश्न , दिव्यांगांचे प्रश्न , दिव्यांगांसाठी हक्काचे घर दिव्यांगांना फक्त पेन्शनच नव्हे तर दिव्यांग एक उद्योजक बनला पाहिजे यासाठी त्यांना लागणारे प्रशिक्षण लागणारी व्यावसायिक जागा लागणारे भांडवल आणि व्यवसायाचे मार्केटिंग याबद्दल मार्गदर्शन मेळावे गावोगावी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button