क्राईम

मित्राकडे खून्नसने का बघितले या कारणावरुन १७ वर्षाच्या मुलावर कोयत्याने वार

सात आरोपी अटकेत

शिरुर : ( डेली न्यूज पोस्ट टीम )
कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या सात आरोपीना अटक केली असून त्यांना २९ मार्च पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील प्लेटोर सोसायटीचे समोर २३ मार्च रोजी रात्री ९ च्या वेळी सौरभ श्रीराम राठोड
वय -१७ सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. शिवाजीनगर, ता. गंगाखेड, जि. परभणी याला गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे व इतर दोन अनोळखी जणांनी सर्व सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे यांनी ‘ तु आमचा मित्र ओंकार देशमुख यास खुन्नस देवुन का बघितले . तुला माहित आहे का, ओंकार देशमुख कोण आहे, थांब तुला जिवंतच सोडत नाही असे म्हणुन ओंकार देशमुख व रोहन बोटे याने त्यांचेकडील कोयत्याने सौरभ राठोड याचे पोटात, डोक्यात, पाठीत कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले . तसेच इतर साथीदार आरोपींनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन सौरभ श्रीराम राठोड यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता . या प्रकरणी कु. यश राजु धनवटे सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. रामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून २४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .


गुन्हाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीस पथकासह सदर गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून आरोपीचे शोध कामी पोलीस स्टेशन कडील तपास पथक, स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांना सुचना देवुन तपासासाठी रवाना केले. तांत्रिक माहितीच्या व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपी हे केज, जि. बीड हद्दीत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज पोलीस स्टेशनमधील पोलीसांची मदत घेवुन आरोपीना ताब्यात घेतले . सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण व तपास पथकाने केज पोलीस स्टेशन, जि.बीड येथुन आरोपींना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला हजर केले आहे. सदर गुन्ह्यामध्ये १ ) शंकर जालिंदर करंजकर वय १९ वर्षे, मुळ रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव (२) ओम दत्ता चव्हाण वय १८ वर्षे, २ महिने, मुळ रा. धानोरा, ता. करंजा, जि. वाशिम, (३ ) रोहन रघुनाथ बोटे वय १८ वर्षे, ०४ महिने, मुळ रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर. (४ ) ओंकार विजय देशमुख वय १८ वर्षे, १०महिने, मुळ रा. डोनवाडा, ता. वसमत जि. हिंगोली. (५ ) गिरीश गोविंद क-हाळे वय २० वर्षे, मुळ रा. हिवरा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली. (६) गोरख विठ्ठल मोरे वय २२ वर्षे, मुळ रा. कृष्णानगर, मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड (७ ) हर्षल सुरेश पारवे वय २० वर्षे, मुळ रा. शिवानी, ता. शेणगाव, जि. हिंगोली. सर्व सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. यांना २५ मार्च रोजी अटक करण्यात आली . या सर्वाना न्यायालयाने दि. २९ मार्च रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन विधिसंघर्षीत बालकाचा देखील समावेश असून त्यास पुणे, औंध येथुन ताब्यात घेवुन जिल्हा बाल न्यायालय, येरवडा, पुणे येथे हजर करण्यात आले आहे.
हा तपास पोलीस अधीक्षक देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, योगेश गुंड, प्रविण पिठले, पो.हवा. विजय सरजिने, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर, माऊली शिंदे, रामेश्वर आव्हाड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पो. हवा. जनार्धन शेळके, संजय जाधव, यांनी तसेच केज पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक वैभव पाटील, यांनी केला . सदर गुन्हयांचा पुढील तपासपोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button