धार्मिंकविशेष

शिरुर मध्ये श्रीराम नवमी उत्सहात साजरी

शिरुर  दिनांक  ( द डेली न्यूज पोस्ट -24) ‘सियावर रामचंद्र की जय’ , ‘जय श्रीराम’ च्या जयघोषात शिरुर परिसरात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

 शहरातील राम आळीतील समस्त नामदेव शिंपी समाज श्रीराम मंदिरात  नामदेव शिंपी समाज  यांचा वतीने  रामजन्मसोहळा कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते .  यावेळी  श्रीरामच्या जयघोष करण्यात आला .  नेवासा येथील ह. भ .प  सदाशिव महाराज तोगे  यांचे श्रीरामजन्मावर किर्तन झाले.श्रीराम जन्माचा पाळणा म्हणण्यात आल्या नंतर  सुंटवठाचा  प्रसादाचे वाटप करण्यात आले .  श्रीराम नवमी निमित्त राममंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती.  विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरुर प्रखंड  यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,समस्त नामदेव शिंपी समाजचे विवेक बगाडे ,सिध्देश्वर बगाडे ,राजू बोत्रे , नाना पाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक  उपस्थित होते . शहरातील शिवसेवा मंदिर , शनि मंदिर व रामलिंग मंदिर  याठिकाणीही श्रीराम नवमीच्या कार्यक्रम पार पडला .
फोटो ओळी
शिरुर शहरातील राम आळी तील श्रीराम मंदिरातील मुर्ती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button