क्राईम
हॅलोजन लावत असताना इलेक्ट्रिक करंट लागल्याने मृत्युमुखी
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
हॅलोजन लावत असताना पिंपरखेड , ता. शिरुर येथे इलेक्ट्रिक करंट लागल्याने गणेश लक्ष्मण गुंड वय ४२ वर्ष रा. पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे हे मृत्युमुखी पडले .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत आर. एस मांडवी सहाय्यक फौजदार मंचर पोलीस स्टेशन यांनी खबर दिली आहे .
पिंपरखेड येथे गणेश लक्ष्मण गुंड वय ४२ वर्ष रा. पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे हे हॅलोजन लावत असताना त्यांना इलेक्ट्रिक करंट लागल्याने ते बेशुद्ध पडले.
त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे घेण्यात आले . तिथे डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहे .