विशेषशैक्षणिक

शिरुर नगरपरिषदेच्या तीन शाळांचे रंगरंगोटीने रुपडे बदलले

तीन शाळांना स्मार्ट टीव्ही व शैक्षणिक साधनाची ही भेट

 

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम 24)
शिरुर नगरपरिषद शाळा क्र .३ क्र . ४ व क्र ६ या सेंटर शाळा व उर्दू शाळे चे रुपडे बदलले गेले असून या संपुर्ण शाळेच्या इमारतीस आकर्षक अश्या रंग देण्यात आला आहे .
शाळेचे व्हरंडे आणि भिंती बोलक्या करण्यात आल्या असून त्या भिंतीवर आकर्षक अशी चित्रे व घोषणा लिहिण्यात आल्या आहेत . एकूणच शाळांच्या या रंगरंगोटी मुळे शाळांचे रुपडे बदलून गेले आहे .
या  सर्व रंगकामाचा खर्चा  बरोबरच या तीन्ही शाळेंकरिता ३  स्मार्ट टी. व्ही.  व शैक्षणिक साधने कोटक महेंद्रा बॅक व भारत केअर्स यांच्या सामाजिक दायित्व निधी अर्थात सीएसआर फंडातून देण्यात आले .
कंपनीने केलेल्या या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिरुर नगरपरिषद सेंटर शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील , कोटक महेंद्रा बॅकेंचे रिझनल बिझनेस हेंड सत्यनील राजणीकर ,एरिया मॅनेजर सचिन देशमुख , एरिया मॅनेजर केतन भोसले , ब्रॅंच मॅनेजर अमोल आढाव ,  मुख्याध्यापक संजय वाघ ,मुख्याध्यापिका अलका उबाळे ,मुख्याध्यापक शब्बीर शेख ,बॅकेचे  यशवंत अभंग ,गणेश औटी,  डेक्कन स्कूल शिरुरचे प्राचार्य डॉ .समीर ओंकार ,पालिकेचे आधिकारी  पंकज माने , दत्तात्रेय बर्गे , कार्यालयीन अधीक्षक राहूल पिसाळ , पालिका शिक्षण विभागातील कुलदीप जाधव , माजी मुख्याध्यापक विलास लोळगे ,स्वप्नील बोडसे  आदी उपस्थित होते .
याप्रसंगी मुख्याधिकारी प्रीतम पाटील म्हणाले की शासन शिक्षणाचा आणि आरोग्याचा चांगल्या  सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे .शिरुर नगरपालिका नेहमीच शाळांना प्रोत्साहन देईल . पालिकेच्या शाळा मधील विद्यार्थी वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पाटील यांनी केले .महेंद्रा कोटक बॅकेने शिरुर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
सत्यनील राजणीकर म्हणाले की शिरुर नगरपरिषद शाळा रंगरंगोटी व अन्य कामे महेंद्रा कोटक बॅंकेने  सीएसआर फंडातून काम केली आहेत .नवीन जनरेशन सन २०१० नंतरची  अल्फा जनरेशन ही जगाला पुढे घेवून जाणारी आहे . चांगल्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्याना मिळेल या साठी कोटक महेंद्रा बॅक सतत मदतीचा हात देईल.
कार्यक्रमाचा सुरवातीस स्वागत गीत व प्रतिमापूजन झाले .प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय वाघ यांनी केले . सूत्रसंचालन  अशोक मानमोडे यांनी केले . अनिता धुमाळ यांनी आभार मानले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button