शैक्षणिक
पाषाणवाडी जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन संपन्न
नृत्यांचे सादरीकरण करत प्लॅस्टिकमुक्ती, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ति यावर प्रबोधन

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )जिल्हा परिषद शाळा पाषाणवाडी शिरुर येथील शाळेच्या मुलांनी वार्षिक स्नेहसंमेलनात बहारदार असे नृत्यांचे सादरीकरण करत प्लॅस्टिक मुक्ती, पर्यावरण संवर्धन, तंबाखूमुक्ती यावर नृत्यांच्या माध्यमातून प्रबोधन केले .

या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाट्न शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर माजी आदर्श सरपंच अरुण घावटे मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यानी बाल नाटिका ही सादर केली.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असलेले या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन द्ववारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असलेले या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन द्ववारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.यावेळी माजी सरपंच सोमनाथ घावटे, माजी उपसरपंच नामदेवराव घावटे अभिलाष घावटे, ग्रामपंचायत समिती सदस्य सचिन घावटे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली घावटे व मोनिका जाधव ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश घावटे, विजय घावटे,अजित कर्डीले,राजेंद्र कर्डीले,सोमेश्वर घावटे,माजी सैनिक खंडू बोऱ्हाडे, व्यस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक माऊली पुंडे यांनी सूत्रसंचालन केले . उपशिक्षिका कुमुदिनी बोऱ्हाडे यांनी आभार मानले.


