महाराष्ट्र
माझे अस्तित्व शक्ती एकल महिलांची” उपक्रमांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन शिरूर तालुक्यातील निमोणे व न्हावरे येथे 14 नोव्हेंबर रोजी शिबिर
शिरूर{डेली न्यूज पोस्ट टीम -24}-पुणे जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “माझे अस्तित्व शक्ती एकल महिलांची” या उपक्रमांतर्गत पंचायत समिती शिरूर मार्फत विशेष एकल महिला शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिली.
या उपक्रमाचा उद्देश विधवा, घटस्फोटित व गरजू एकल महिलांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ मिळवून देणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.
शिबिरातील प्रमुख योजना व
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, लेक लाडकी योजना, दक्ष प्रशिक्षण, संजय गांधी निराधार अनुदान योजना, एकल महिला बचत गटांना बँक कर्ज पुरवठा,
प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांग घरकुल योजना, विविध दाखले (जन्म, जात, नमुना ८), आधार अपडेट, रेशन कार्डसंबंधी सेवा, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) कार्ड वितरण, तसेच आरोग्य तपासण्या – स्त्रीरोग, नेत्र, दंतरोग, जनरल तपासणी, कीटकजन्य आजार व कर्करोग पडताळणी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत.


विधवा, घटस्फोटित आणि गरजू एकल महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक: 14 नोव्हेंबर 2025 रोजी मातोश्री. मंगल कार्यालय, निमोणे येथे सकाळी 10.00 वाजता व स्वयंवर मंगल कार्यालय, न्हावरे येथे दुपारी 2.00 वाजता शिबीर होणार आहे.
हा उपक्रम ग्रामीण भागातील एकल महिलांच्या आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरणाचा प्रभावी टप्पा ठरणार आहे.
