Uncategorizedविशेषशैक्षणिक

वाढदिवसा निमित्ताच्या सेलिब्रेशनच्या खर्चाला फाटा देत भारतीय स्टेट बँकेचे नोडल अधिकारी निखिल अजित डोंगरे यांची नगर परिषद शाळा क्रमांक सहा ला साऊंड सिस्टिम भेट

  1. भारतीय स्टेट बँक नोडल अधिकारी निखिल अजितराव डोंगरे यांनी वाढदिवसानिमित्त शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक सहा यांना साऊंड सिस्टिम भेट दिली.

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)

वाढदिवसा निमित्तच्या  सेलिब्रेशनच्या खर्चाला फाटा देत भारतीय स्टेट बँक पुणे येथे नोडल अधिकारी  म्हणून कार्यरत असणारे निखिल अजितराव डोंगरे यांनी ज्या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्या शिरूर नगरपालिकेच्या शाळा क्रमांक -6 या शाळेस आधुनिक साऊंड सिस्टीम भेट देत आपल्या शाळे विषयी कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान ही साऊंड सिस्टीम माजी नगरसेवक मंगेश खांडरे, एस. टी. महामंडळ मधील सेवानिवृत्त अधिकारी व निखिल डोंगरे यांचे वडील अजितराव डोंगरे, नोटरी रवींद्र खांडरे, पुणे जिल्हा भाजपा अल्पसंख्यांक सेलचे राजू भाई शेख, भाजपाचे पदाधिकारी मितेश गादिया, निलेश नवले  व  सामाजिक कार्यकर्ते दगडू सकट यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघ व शिक्षिका अनिता धुमाळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

 अजितराव डोंगरे म्हणाले की शिरूर नगरपालिकेच्या मराठी शाळेत निखिल डोंगरे यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.ज्या शाळेने जीवनास आकार दिला . त्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला साऊंड सिस्टिम ची आवश्यकता आहे याची माहिती मिळाल्यावर ती साऊंड सिस्टिम देण्याचा निर्णय घेतला. यापुढे शाळेत सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

 माजी नगरसेवक मंगेश खांडरे म्हणाले की शिरूर नगरपरिषदेच्या मराठी शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. शाळेविषयी कृतज्ञता म्हणून निखिल डोंगरे यांनी साऊंड सिस्टिम दिल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय वाघ यांनी केले. त्यात त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना नक्षलवादी भागात केलेला सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले त्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने हार्दिक अभिनंदन

 नोटरी रवींद्र खांडरे यांचेही यावेळी मनोगत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका अनिता धुमाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button