शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)येथील तेजस श्यामसुंदर चिखलीकर यांनी तीसरादा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

तीन वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आगोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तेजस यांच्या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .तेजस हे वयाच्या २१ व्या वर्षी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले असून सध्या पाटबंधारे विभागात वर्ग १ च्या अधिकारी म्हणून कार्यरत आहे .
सन -२०२१ , सन २०२२ व आता जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांची १०७ रॅक आली आहे . त्यांना यापूर्वी ‘प्राईड ऑफ आर्य वैष्णव 2023’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

तेजस यांचे वडील श्यामसुंदर हे इंजिनिअर असुन शिरुर येथे बांधकाम व्यवसायिक आहेत. तर पत्नी दिपाली गृहिणी असून मुलगी कु .प्राची ही शिक्षण घेत आहे .
तेजस हे सन २०१० मध्ये इयत्ता ४थी च्या स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात ७ वे आले होते .त्यानंतर ५ व्या इयत्तेसाठी त्याची निवड ज्ञानप्रबोधिनी , सदाशिव पेठ पुणे येथे झाली . पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिअरिंग मध्ये सलग ४ वर्षे टॉपर असलेले तेजस सिओपीचे सुवर्णपदक विजेता आहेत . . तेजस यांचा गेटमध्ये देशपातळीवर २००वा रँक होता .तेजस हे बी.टेक. सिव्हील झाले असून
आय.आय.टी. पवई येथे एम. टेक .साठी निवड झाली होती .
परंतु प्रशासकीय सेवेत जाण्याचा ओढीने एम.पी.एस.सी. च्या अभ्यास करण्याचा निर्णय घेवुन परीक्षेची तयारी त्याने सुरु केली त्याखेरीज पी.एस.यु. मधील २० ते २५ लाखांच्या पॅकेजची संधी सोडली आणि एम .पी .एस .सी . च्या अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले व वयाच्या २१ व्या वर्षी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले . पाटबंधारे खात्यात क्लास वन अधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे . सध्या तेजस हे
परंतु प्रशासकीय सेवेत जाण्याचा ओढीने एम.पी.एस.सी. च्या अभ्यास करण्याचा निर्णय घेवुन परीक्षेची तयारी त्याने सुरु केली त्याखेरीज पी.एस.यु. मधील २० ते २५ लाखांच्या पॅकेजची संधी सोडली आणि एम .पी .एस .सी . च्या अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले व वयाच्या २१ व्या वर्षी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले . पाटबंधारे खात्यात क्लास वन अधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे . सध्या तेजस हेमृद व जलसंधारण आधिकारी माळशिरस येथे कार्यरत आहे.
. तेजस यांच्या यु.पी.एस.सी च्या परीक्षेचा अभ्यास ही सुरु आहे .
. तेजस यांच्या यु.पी.एस.सी च्या परीक्षेचा अभ्यास ही सुरु आहे .यशाबद्दल तेजस यानी सांगितले की आई वडिलांचे व गुरुजनाचे योग्य मार्गदर्शन , अभ्यासातील सातत्य , सकारात्मक विचार ,वेळेचे योग्य नियोजन या बाबींमुळे यश प्राप्त केले . तेजसच्या यशाबद्दल विविध संस्था व संघटना यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे .
