Uncategorized
घरात घुसून वृद्धेला मारहाण; १.४० लाखांचा ऐवज लंपास
शिरूर(डेली न्यूज पोस्ट टीम -24)शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेला मारहाण करून तब्बल १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.
१० ऑगस्ट रोजी रात्री १०.१५ वाजता ते ११ ऑगस्ट रोजी पहाटे च्या दरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांच्या राहत्या घरात घुसून, त्यांच्या आईला तोंडावर व डोक्यात मारहाण केली. त्यानंतर घरातील दोन गंठण (२ तोळे, किंमत ८०,००० रुपये), कानातील फुले व वेल (१ तोळा, किंमत ४०,००० रुपये) तसेच मनी मंगळसूत्र (५ ग्रॅम, किंमत २०,००० रुपये) असा एकूण १.४० लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५८७/२०२५, भा.दं.सं. कलम ३०९(६), ३०५ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या पोलीस उपनिरीक्षक नकाते हे करत आहेत.