महाराष्ट्र

खाशाबा जाधव यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : प्रा. शशिकांत जाधव

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रा. शशिकांत जाधव यांनी केले. येथील डेक्कन स्कूलमध्ये आयोजित खाशाबा जाधव यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर डेक्कन स्कूलच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व्ही. डी. कुलकर्णी, खाशाबा जाधव यांच्या परिवारातील सदस्य प्रा. शशिकांत जाधव, शाळेचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, प्रा. सतीश धुमाळ, शिक्षक प्रतिनिधी सौ. जयश्री दांडगे, पूर्व-प्राथमिक विभाग समन्वयक सौ. डायना बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रा. जाधव यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसमोर खाशाबा जाधव यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडून सांगितला. बालपणापासूनच विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खाशाबा जाधव यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी पहिली कुस्ती जिंकली. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य खर्डेकर यांनी त्यांची गुणवत्ता ओळखून त्यांना कोल्हापूरला आणले आणि तेथेच त्यांच्या कुस्ती कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली.

उपनगराध्यक्षपदी मीतेश प्रदीप गादिया यांची तर स्वीकृत नगरसेवक पदी अभिजीत गणेश पाचर्णे, राजेंद्र अरुण लोळगे व अमोल चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने हार्दिक शुभेच्छा
उपनगराध्यक्षपदी मितेश प्रदीप गादिया यांची तर स्वीकृत नगरसेवक पदी अभिजीत गणेश पाचरणे राजेंद्र अरुण लोळगे व अमोल चव्हाण यांच्या निवडीबद्दल डेली टीम न्यूज पोस्ट २४च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

ऑलिंपिक स्पर्धेसाठी खाशाबा जाधव यांना पाठविण्यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील नागरिक व शिक्षकांनी वर्गणी जमा केल्याची आठवण प्रा. जाधव यांनी करून दिली. आपल्या कारकिर्दीत बहुतांश कुस्त्या तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारताला पहिले ऑलिंपिक कांस्यपदक मिळवून दिले. पुढे पोलिस खात्यात क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष, चिकाटी आणि देशाभिमानाचे प्रतीक असल्याचे मत प्रा. जाधव यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. प्रिया नरवडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button