विशेष

९ जून २०२५ रोजी महसूल लोक अदालत

  • शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)शिरुर तालुक्यातील महसुल विभागामार्फत उपविभागीय अधिकारी , तहसिलदार , मंडल अधिकारी स्तरावरील प्रलंबित महसुल खटले सांमजस्याने तडजोडीने सोडविणेकरीता ९ जून रोजी शिरुर व उपविभागीय आधिकारी पुणे येथे महसूल लोक अदालत आयोजित केलेलो आहे.

    महसुल विभागातील उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार , मंडल अधिकारी यांचेकडे अनेक महसुली दावे दाखल असतात. दाव्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने दावे दिर्घकाळ प्रलंबित राहतात. त्यामुळे ब-याच वेळा पक्षकारांना निवाडा मिळण्यासाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. यासाठी उपाय म्हणून विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अन्वये स्थापन झालेली लोक अदालत ही एक पर्यायी विवाद निवारण यंत्रणा आहे. ज्यामध्ये मुख्यतः दिवाणी दाव्यांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोडीने मोठया संख्येने दावे निकाली काढले जातात. या माध्यमातून शिरुर तालुक्याकरीता लोक अदालत आयोजित केलेली आहे. यासाठी पक्षकारांना नमुना अ या अर्जाव्दारे दिनांक 21 मे 2025 ते 30 मे 2025 या कालावधीत ज्या स्तरावर खटला प्रलंबित आहे. त्या न्यायाधिकरणाकडे अर्ज करावेत. नमुना -अ अर्ज तलाठी सजा , मंडलअधिकारी कार्यालय , तहसिल कार्यालय / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय येथे उपलब्ध आहेत. प्राप्त अर्जाचे अनुषंगाने पूर्व तयारी बैठक दिनांक २ जुन २०२५ रोजी आयोजित केली आहे व प्रत्यक्ष महसुल लोक अदालत दिनांक ९ जुन २०२५ रोजी मंडल अधिकारी स्तरावरील त्या- त्या मंडळ अधिकारी कार्यालयात व तहसिल स्तरावरील फेरफार अदालत सभागृह क्र. 1. तिसरा मजला, तहसिल कार्यालय शिरुर येथे व प्रांत अधिकारी स्तरावरील फेरफार अदालत उपविभागीय अधिकारी पुणे, उपविभाग पुणे यांचे कार्यालय, जुनी जिल्हा परिषद, तिसरा मजला, पुणे येथे होणार आहे. तरी तालुक्यातील रस्ता , अतिक्रमण , फेरफार , आरटीएस व इतर प्रकरणांचे अनुषंगाने तडजोडीने प्रकरण निकाली काढणे कामी जास्तीजास्त पक्षकारांनी महसूल लोक अदालत मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button