विशेष

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर जयंतीनिमित्ताने ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात शिरूर मध्ये पालखी सोहळा


शिरूर( डेली न्यूज पोस्ट -24)
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर जयंतीनिमित्ताने
ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे केले.
पालखी सोहळ्याची सुरुवात सुरुवात नगर परिषदेच्या सेंटर शाळेतून झाली. पालखी सोहळा एस.टी. स्टँड, जुनी नगरपरिषद, जैन स्थानक, पाच कंदील चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे होऊन मुंबई बाजारातील नगर परिषद शाळेत गेला. वपालखी सोहळ्यात हरीनामाचा जप व संताच्या जयघोष करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या तालावर सर्वजण भक्ती रसात तल्लीन झाले होते.
सोहळ्यात शिरूर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, कर निरीक्षक माधव गाजरे, संगणक अभियंता रत्नदीप पालखी, लेखापाल अंकुश इचके, शिक्षण प्रशासनाधिकारी किसनराव खोडदे, मुख्याध्यापक संतोष चव्हाण , मुख्याध्यापक संजय वाघ , तसेच चंद्रकांत पठारे, भगवान दळवी, लखन केदार, मुकादम सुरज चव्हाण,व अन्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी वारकरी महिला, विद्यार्थी आणि तरुणांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पारंपरिक फुगडी खेळली.
संत साहित्य, वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीवर आधारित प्रेरणादायी प्रवचन झाले. यामध्ये संतांचा जीवनप्रकाश आणि भक्तीची गोडी भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आली. भाविक वारकऱ्यांनी पारंपरिक अभंग, ओवी आणि हरिपाठ सादर करून वातावरणात भक्तिरस ओतला. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

श्री. संत निळोबाराय वारकरी संस्था, श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री हरिभक्त पारायण गणेश महाराज शेंडे व त्यांचे वारकरी पथक या सोहळ्यात सहभागी झाले. त्यांच्या कीर्तन, अभंग आणि हरिनामाच्या गजरांनी सर्व भाविकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले.
संपूर्ण शहरात भक्तिभाव, सांस्कृतिक एकात्मता आणि वारकरी परंपरेचा वारसा अनुभवायला मिळाला. हा सोहळा शिरूरच्या वारकरी परंपरेतील एक अविस्मरणीय क्षण ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button