शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम ) ध्येयप्राप्तीसाठी नियोजन महत्त्वाचे असल्याचे सीए अभिजीत थोरात आमदाबाद , ता . शिरुर येथे म्हणाले .
पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय ,आमदाबाद या शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.यावेळी कैलास सत्यार्थी सोशल फाउंडेशन च्या वतीने शाळेसाठी भेट म्हणून दिलेल्या एलसीडी प्रोजेक्टर ,संगणक व साऊंड युनिट चे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभनाताई पाचंगे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत थोरात हे उपस्थित होते. आमदाबाद चे आदर्श माजी सरपंच प्रकाशराव थोरात, सरपंच अनिता घुले ,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, रमेशराज शास्त्री पातुरकर, अविनाश सोनार, कैलास सत्यार्थी सोशल फाउंडेशनच्या समन्वयक उज्वला इचके , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत साळवे, उपाध्यक्ष दत्तात्रय शेलार, पोलीस पाटील दिलीप साळवे, माजी आदर्श मुख्याध्यापक फक्कडराव थोरात, पालक प्रतिनिधी डॉ. संतोष शेळके, चंदू शितोळे, शिवलिंग देव्हाडे, भिवाजी थोरात, फटांगरे , डॉ. पृथ्वीराज थोरात, मंजुश्री थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका खोमणे , संजना थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला . विद्यार्थी आणि मान्यवरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांनी केले. विद्यालयातील शिक्षक पोटे , पोंदे , दासीमे , सौ. कोरडे मॅडम , शिंदे , ढेंगळे मॅडम,शरद येवले, महेश कारकुड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी प्रज्ञा इनामदार आणि साक्षी चोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षक पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


