विशेष
शिरूर (डेली न्यूज पोस्ट -24) शिक्षणाची जिद्द असेल व नवीन काही शिकण्याची आवड असेल तर वयाचा अडसर शिक्षणात येत नाही. बाबुराव पाचंगे यांनी वयाच्या 63 व्या वर्षी वकिलीची पदवी मिळवली हे कौतुकास्पद आहे असे महाराष्ट्र राज्य प्राचार्य फोरमचे माजी अध्यक्ष व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरिदास जाधव मुक्त विद्यापीठाच्या शिरूर अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक डॉ .प्रा .अंबादास केत, डॉ. प्रा. भोईटे प्रा. डॉ. रेणुका गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या वर्षी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले.पाचंगे म्हणाले की मुक्त विद्यापीठाच्या मुळे माझे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारून बीएची पदवी मिळाली व त्यानंतर वकील होत आले मी आगामी काळात ग्रामीण भागातील लोकांना कायदेविषयक मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.