निधन वृत्त
पंचायत समितीतील सेवानिवृत्त कर्मचारी दगडू औटी यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर पंचायत समितीतील सेवानिवृत्त कर्मचारी दगडू लक्ष्मण औटी वय, ८५ यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ विवाहित मुली, जावई,नातवंडे असा परिवार आहे.
पंचायत समितीतील कार्यतत्पर व प्रामाणिक कर्मचारी अशी त्याची ओळख होती. जिजामाता महिला सहकारी बँकेतील अधिकारी शिवाजीराव औटी यांचे ते वडील होत.
तर बँक ऑफ महाराष्ट्र मधील सेवानिवृत्त अधिकारी अरुण बत्ते व जिल्हा परिषदेचे शिक्षक विनायक पडवळ यांचे ते सासरे होत.व्यवसायिक वैष्णव औटी यांचे ते आजोबा होत.अंत्ययात्रा -शुक्रवार दिनांक १५ मे रोजी रात्री ८ वाजता स्टेट बँक कॉलनी शिरूर येथील राहत्या घरापासून अमरधाम स्मशानभूमी शिरूर येथे जाईल.



