शिरूर नगर परिषदेमध्ये विकासाची अनेक कामे मार्गी लावली जात असून काही जण पाणी योजना व अन्य विषयासंदर्भात घंटानाद आंदोलन करतात. विनाकारण असे आंदोलन करणाऱ्यांना त्यांच्या स्टाईलनेच उत्तर देण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात यांनी दिला आहे.
oplus_131090
काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने शिरूर नगर परिषदेसमोर पाणी योजनेसह अन्य विषयासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.
या घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
महायुतीच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांची भेट घेऊन ते शिरूर मध्ये करीत असलेल्या विविध विकास कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महायुतीच्या वतीने महाविकास आघाडीने केलेल्या घंटानांद आंदोलनाचा निषेध करण्यात आला.
शहर प्रमुख मयूर थोरात म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना शिरूर नगर परिषदेस मोठ्या प्रमाणावर विकास निधी देण्यात आला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव आमदार आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या माध्यमातून शिरूर नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांना निधी प्राप्त झाला आहे . शिरूर साठी महत्त्वकांक्षी असणारी घोड धरणावरून शिरूर शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना माजी खासदार शिवाजी दादा आढळराव यांचे पाठपुराव्यातून मार्गी लावण्यात आली . या योजनेचा कामाचा शुभारंभ सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आला होता.काही लोक या पाणी योजनेच्या संदर्भात राजकारण करत असून काही संबंध नसताना आंदोलन करत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आदरणीय किशोर राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुख्याधिकारी प्रीतम पाटील हे सातत्याने शहराच्या विकासासाठी कार्यरत असतात नुकतेच शहरासाठी एक कोटी रुपयांचे नमो उद्यानही मंजूर केले असल्याचे थोरात म्हणाले. त्याचबरोबर शिरूर नगर परिषदेत राज्यात स्वच्छते संदर्भात पारितोषिक मिळाल्याचेही ते म्हणाले.
भाजपा महिला आघाडीचे अध्यक्ष प्रिया बिरादार, भाजपा सरचिटणीस विजय नरके, शिवसेनेचे सुरेश गाडेकर आदींची यावेळी मनोगते झाली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, भाजपाच्या रेश्मा शेख, अनघा पाठक, निलेश नवले, सागर सातारकर, राजेंद्र शहाणे,युवा सेनेचे शहराध्यक्ष. अमोल लुनिया. शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष.. सुजाता पाटील,गणेश गिरे, प्रमोद महाराज जोशी आदी यावेळी उपस्थित होते.