धार्मिंकविशेष

श्री स्वामी समर्थ मंदिरात ‘स्वामी पहाट’ – गणेश मराठेंच्या भक्तिगीतांनी उजळली दिवाळीची सकाळ

स्वामी समर्थ मंदिरात पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ç

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट-24}
शिरूरच्या प्रीतम प्रकाश नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर  सकाळी भक्तिभाव, सूर आणि आनंदाने उजळला होता. दिवाळीच्या मंगलप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वतीने आयोजित ‘स्वामी पहाट’ या भक्तिमय कार्यक्रमाने शिरूरकरांना आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव दिला.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात श्री स्वामी समर्थांच्या नामगजरासह कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुप्रसिद्ध गायक गणेश मराठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरेल भक्तिगीतांनी वातावरण दुमदुमून गेले. “ओंकार स्वरूपा”, “निःशंक हो”, “धागा धागा”, “तीर्थ विठ्ठल”, “सद्गुरूनाथा हात जोडतो”, “कैवल्याच्या चांदण्याला” यांसारख्या गीतांमधून भक्ती, समर्पण आणि आनंद यांचे अनोखे मिश्रण भाविकांना अनुभवायला मिळाले.
गायक गणेश मराठे यांच्यासह समीर ओंकार, सुषमा झावरे, मानसी घोडके, गोपाल भावसार, डॉ. नूतन क्षीरसागर, नितीन मामिडवार, मोनाली जाधव, केतन गोसावी,डॉ. शिल्पा घोडे यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तबल्याची साथ अनिल गुंदेचा तर तालवाद्य साथ यश बुरांडे यांनी दिली. कार्यक्रमाचे निवेदन व्ही. डी. कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले.
प्रत्येक गीतातली भावना आणि श्रद्धेची ओल भक्तांच्या डोळ्यांत उतरली. गणेश मराठे यांच्या मनमोहक भैरवीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संस्थेच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने हा भक्तिसोहळा आयोजित केला जातो. पहाटेच्या शुभवेळी नामस्मरण, गीत आणि आनंद यांचा संगम साधत शेकडो भाविकांनी स्वामींच्या चरणी आपली अर्पण भावना व्यक्त केली.
या प्रसंगी शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, विलास गोसावी, प्रा. चंद्रकांत धापटे, डॉ. यशवंत घोडे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. सोळुंखे, सनदी लेखापाल विशाल झावरे, प्रमोद काशिकर, सीमा काशिकर, डॉ. अनिता सोळुंखे, प्रकाश वाळकीकर, योगेश वाळकीकर, गणेश घाडगे, भूषण कडेकर, सुधीर कडेकर, सनी पवार, प्रा. संपत लोखंडे, श्यामसुंदर चिखलीकर, संजय तंटक, मयूरेश मास्तोळी, महेश बेंद्रे,राजू वर्मा,डॉ. शोभा वीर, संध्या कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘स्वामी पहाट’ने दिवाळीची सकाळ भक्तीच्या रंगात रंगवली आणि श्रद्धेचा सुगंध सर्वत्र पसरवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button